डॉ मनोज देवकर यांना 2025 चा प्रजासत्ताक दिनाचा पर्यावरण दूत पुरस्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू मा.प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सन्मान
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. मनोज देवकर यांचे कुलगुरू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला 
डॉ. मनोज देवकर यांना यापूर्वीही वनश्री तसेच शासनाचे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे लाखो वृक्षांचे लागवड व संवर्धन यांनी महाराष्ट्रभर वृक्ष संवर्धन चळवळ निर्माण करून अनेक वृक्षमित्र तयार केलेले आहेत वाढत्या प्रदूषणामुळे प्रदूषणाचा नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड तसेच जैवविविधता जपण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपायोजना सातत्याने करत असतात शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शासनाच्या विविध विभागांमध्ये जाऊन प्रबोधन करणे वृक्ष लागवड करणे हे कार्य सातत्याने ते करत आहात व इको नेचर क्लब टीम हे सातत्याने सेवा कार्य करत आहे. शासनाच्या सर्व विभागांना घेऊन सर्व पर्यावरण मित्रांना घेऊन तसेच लोकप्रतिनिधी व अनेकांना एकत्रित करून ही चळवळ सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या याच कार्याचा गौरव म्हणून 2025 चा पुनश्च पर्यावरण दूत पुरस्कार त्यांना देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form