घरफोडी करणाऱ्या चोराच्या सदर बझार डी बी पथकाने ४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या ;केला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-चोरीचा दाखल गुन्हा सदर बझार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकरण पथकाने चार तासाच्या आत उघडकिस आणून गुन्ह्यातील  रोख रक्कम 1,00,000/- - व 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण रुपये 5,00,000/- किमतीचा माल हस्तगत करुन गुन्ह्यातील 100 टक्के माल हस्तगत केला.फिर्यादी नामे सी. विजया राजेश बोब्बा वय. 39 वर्षे रा.सी-10 गौरीशंकर अपार्टमेन्ट रामलाल चौक, सोलापूर यांनी त्यांचे राहते घरातून दिनांक 17/01/2025 ते 24/01/2025 या कालावधीत रोख रक्कम 100,000/- रुपये, एक सुमारे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, सुमारे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 20 ग्रॅम सोन्याचे अंगठ्या असा सर्वमाल रुपये 5,00,000/- किमतीचा अज्ञात चोरट्याने चोरुन नेला वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने ती सदर बझार पोलीस ठाणेस गु.र.नं. 131/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 305 प्रमाणे दिनांक 14/2/2025 रोजी 16.46 वा. दाखल आहे.सदर गुन्ह्याचे तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना, सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सहा. औदुंबर आटोळे व पोकों सागर गुंड, पोकों/ अनमोल लट्टे, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी नमुद फिर्यादीचे घरी काम करणारे महिलाकडे कसुन तपास करुन त्या महिलेकडून गुन्ह्यातील 100 टक्के माल आहे त्या परिस्थितीत जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ,यशवंत गवारे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि नितीन शिंदे, सहा. फौ.औदुंबर आटोळे, पोहेकों संतोष पापडे, पोहेको शहाजहान मुलाणी, पोहेको सागर सरतापे, पोहेकों/ राजेश चव्हाण, पोकों/ सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, मपोहेकॉ स्नेहा किणगी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form