दादासाहेब सरवदे यांचा दणदणीत विजय



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्था 2024/25 ते 2029/30 या निवडणुकित जोडभावी पोलीस स्टेशन ठाणे येथे कार्यरत असणारे दादासाहेब हरिकांत सरवदे यांनी जिल्हामध्ये सर्वात जास्त 868 मताधिक्य घेवून विजय झाले. दरम्यान परिवर्तन विकास आघाडी पॅनल ने आपल्या 14 पैकी 13 जागा निवडून आणुन समृद्धी पॅनल ला मोठा धक्का दिला आहे तरी दादासाहेब सरवदे यांनी त्यांच्या विजयासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील  सभासदांचे आभार व्यक्त केले दादासाहेब सरवदे यांच्या निवडी नंतर त्यांचा सत्कार जोडभावी पेठ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सरांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या या वेळी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी उपस्थीत राहुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form