दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- "वन्स मोअर डान्स अॅकॅडमी" व अ.भा.म.नाट्य परिषद उपनगरीय शाखा, सोलापूर यांचे संयुक्त विदयमाने.मागील १० वर्षातील उदंड प्रतिसादानंतर यावर्षी १ मे महाराष्ट्र दिन निमित्त महाराष्ट्राच्या लोक परंपरेवर आधारित "जय जय महाराष्ट्र" हा भव्य सांस्कृतीक कार्यक्रम १ मे २०२५ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर केला जाणार आहे.सोलापूर जिल्हयातील १५० ते २०० बालकलाकार वय वर्षे (०७ ते १७) यांना घेवून दरवर्षी प्रमाणे यंदाही हा भव्य कार्यक्रम सादर होणार आहे.या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दि.१६ मार्च रोजी सकाळी १० ते १ पर्यंत अॅडमिशन घेवून कालाकारांची निवड करण्यात येणार आहे.पुढच्या पिढीला आपल्या लोकपरंपरेची ओळख होवून हा वारसा पुढे चालावा यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी सादर केला जातो. जय जय महाराष्ट्र परिवारातर्फे कुठल्याही प्रकारे व्यावसायीकता न आणता अनेक संस्था, व्यक्ती यांच्या माध्यमातून केवळ आपली संस्कृती टिकावी या उद्देशने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.या कार्यक्रमात वासुदेव, शेतकरी, धनगरी, ठाकर, गोंधळ, दिंडी, पोतराज, डोंबारी, लावणी असे एकूण १८ नृत्यप्रकार सादर करुन श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होते तरी सोलापूरातील मुलांनी व पालकांनी याची नोंद घेवून रविवार दि.१६ मार्च रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे हॉल मध्ये सकाळी १० वाजता घेवून यावे. असे आवाहन करण्यात येत आहे.या कार्यक्रमासाठी सुदर्शन माने, विनायक शिंदे, अंकुश वाघमारे, हरिष पुष्ठा यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहतील.अशी माहिती पत्रकार परिषदेत रवींद्र देशमुख यांनी दिलं आहे याप्रसंगी वर्षा मुसळे रेणुका प्याटी अभिंजली जाधव मंजुषा देशमुख नितीन जाधव शैलजा गोरे आदी उपस्थित होते.
