दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- "जय जय महाराष्ट्र" या भव्य डान्स शो ची ऑडिशन रविवार १६ मार्च रोजी मुळे हाॅल येथे पार पडली.यंदाचे हे अकरावे वर्ष आहे. दरवर्षी एक मे महाराष्ट्र दिना दिवशी जय जय महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील लोककलेवर आधारित नृत्य सादर होतात. यामध्ये पहाट गीत वासुदेव पिंगळा ,शेतकरी गीत ,डोंबारी गीत ,पोतराज गीत, कोळीगीत, धनगरी गीत, लावणी, दिंडी शिवराज्याभिषेक सोहळा अशी गाणी सादर होतात यामध्ये आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या महाराष्ट्रातील लोक पावत चाललेल्या कलाप्रकारांना नव संजीवनी देतात हे बालकलाकार.यासाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून सुदर्शन माने विनायक शिंदे अंकुश वाघमारे हरीश पुट्टा मेहनत घेतात.साधारण दीडशे ते दोनशे वय वर्ष सात ते सतरा वयोगटातील विद्यार्थी असतात... 10 एप्रिल ते 30 एप्रिल रोज दहा ते पाच असा हा नृत्य सराव असतो व एक मे रोजी सादरीकरण असते. रविवारी पार पडलेल्या ऑडिशनसाठी सोलापुरातून तसेच सोलापुरातील आजूबाजूच्या गावातील बालकलाकारांनी ही नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे नूतन अध्यक्ष विजयकुमार साळुंखे आणि उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर उपाध्यक्ष शोभाताई बोल्ली यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी नवीन कार्यकारणी मधील कार्याध्यक्ष आशुतोष नाटकर कार्यकारणी सदस्य संदीप जाधव इम्तियाज मालदार आणि वर्षा मुसळे हे सर्व हजर होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिंजली जाधव आणि दिनेश राठोड यांनी केले. तर नितीन जाधव,किरण कोल्हापूरे ,रमेश जाधव,नंदीमठ सर,शैलजा गोरे, रेणुका प्याटी, रूपाली वाघमारे, वैशाली माकणे, रजनी कोल्हापुरे यांनी सर्व कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
