पुण्यातील शिवाजीनगर परिसराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे नामकरण करण्यात यावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची शासनाला विनंती

 


दैनिक_लोकशाही_मतदार

मुंबई- पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, "शिवाजीनगर हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. येथे अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर राहतात. या परिसराला ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे नाव देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे नामकरण करण्यात यावे," अशी विनंती शासनाला केली.यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली असून शासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे मंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेलाही त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form