दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- युवा वकील ॲड.सागर हंबीरराव यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक लोकशाही मतदार वतीने जेष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकशाही मतदार चे निवासी संपादक डॉ.कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ॲड.सागर हंबीरराव हे एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व असून नेहमीच गोरगरिबांच्या अडचणींना धावून जाणारा माणूस अशी त्यांची ख्याती आहे. ॲड.सागर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा जपत त्यांनी काम केले आहे.वकिली क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी योग्य कायदेशीर मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.ज्यामुळे गोरगरीब वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना दिलासा मिळाले आहे.वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना ॲड.सागर हंबीरराव म्हणाले की मी माझ्या वतीने शक्य तितके समाजातील वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना माझ्या
वकिली च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचा कायदेशीर सल्लागार म्हणून माझी नुकतीच नियुक्ती झाली असून वेळोवेळी कायदेशीर जनजागृतीसाठी वृत्तपत्रातून लेख प्रकाशित करून जनजागृती करण्याचे काम देखील करेन,नेहमीच सर्वांच्या सेवेसाठी तत्पर राहिन असे म्हणत वाढदिवसाच्या सत्कारपर भावना व्यक्त करत आभार मानले. याप्रसंगी दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद, पत्रकार अनसार शेख , रोहित घोडके , ॲड.रोहित थोरात आदी उपस्थित होते.

