मंगळवेढा येथील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा स्मारकाच्या जागा उपलब्धतेसाठी समिती करण्यात येणार गठित



दैनिक_लोकशाही_मतदार

मुंबई | सोलापूर :- मंगळवेढा (जि. सोलापूर) ही संतांची भूमी आहे.  या भूमीत  जगद्ज्योती महात्मा  बसवेश्वर आणि  संत चोखामेळा यांच्या नियोजित स्मारकासाठी जागा निश्चितीनंतर स्मारक उभारणीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच स्मारक उभारणी हा केंद्रबिंदू म्हणून स्मारकाच्या जागा निश्चितीसाठी नव्याने  समिती गठित केली जाईल, असे  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.महात्मा बसवेश्वर आणि  संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत सदस्य समाधान आवताडे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजीत पाटील व विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला.मंत्री गोरे यांनी सांगितले, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी यापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती मात्र सध्या ही समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे नव्याने समिती गठीत  केली जाईल.महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी कृषी विभागाची जागा प्रस्तावित होती, मात्र ती नाकारल्यानंतर कृषि तलावाच्या बाजूची जागा स्मारकासाठी विचाराधीन आहे. ही जागा देण्याच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.मंत्री गोरे यांनी सांगितले, मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी ही जागा निश्चित उपलब्ध करून देण्याबाबत मंगळवेढा नगरपरिषदेला सूचित केले जाईल. मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आणि  संत चोखामेळा स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form