दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- भीम आर्मी महाराष्ट्रात तळागाळात रुजवणारे पूर्णवेळ भीम आर्मी या सामाजिक संघटनेसाठी स्वतःला झोकून देऊन अन्यायाविरुद्ध आक्रमक शैली अशी ओळख असलेले भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अंबेजोगाई येथे सहकारी पदाधिकारी यांना घेऊन कार्यक्रमासाठी निघाले असता निवडुंगे गाव तालुका पाथर्डी जिल्हा नगर याठिकाणी महिंद्रा स्कॉर्पिओ एम एच -०१-ए एच ९८२४ या गाडीचा प्रवसा दरम्यान श्वान (कुत्रा) आडवे आल्याने त्याला वाचवण्यास गेले असता वरील नमूद गाडी रस्त्याला असलेल्या डिव्हायडरला आदळून अपघात झाले यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात सोमवार २१ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता झाले असून गाडीत असणाऱ्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी सहकारी सुखरूप असून अशोक कांबळे यांना किरकोळ मुक्का मार लागले असून इतर कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना दिले आहे.
हे पदाधिकारी होते गाडीत -
अशोक कांबळे - राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी तथा केंद्रीय कोअर कमिटी सदस्य,रमेश बालेश - महाराष्ट्र उपाध्यक्ष भीम आर्मी,परीक्षित शेंदे-बदलापूर शहर अध्यक्ष,दिपाचन शिंग उर्फ मोनू शिंग -भीम आर्मी सदस्य
असा आहे अशोक कांबळे यांचा दौरा -
२१ एप्रिल तारखेला मुंबई वरून अंबेजोगाई कडे प्रयाण
२२ तारखेला सकाळी ९ वाजता अंबाजोगाई येथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम
२३ तारखेला लातूर मध्ये दुपारी १ वाजता लातूर जिल्यातील पदाधिकारी यांची बैठक तसेच निलंगा या ठिकाणी रात्री ८ वाजता आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
२४ तारखेला सोलापूर
२५ तारखेला पुणे
२६ तारखेला मुंबई
या अपघातानंतर देखील उपचार घेऊन समाजातील लोकांसाठी चळवळीसाठी पुन्हा अशोक कांबळे हे पुढच्या नियोजित दौऱ्यावर निघाले असून चिंता करण्यासाठी काही बाब नसल्याचे कांबळे यांनी नमूद केले आहे. अश्या खमक्या आणि चळवळीशी प्रमाणिक व धाडसी नेत्याला अपघातानंतर देखील कार्यक्रमाच्या दौऱ्यावर जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.


