"सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या"

सोलापूर- सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केल्या आहेत. या संदर्भातील आदेश रविवारी माध्यमांसमोर आला.दरम्यान, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली टेंभुर्णी पोलीस ठाण्याहून नियंत्रण कक्ष येथे केली आहे. नियंत्रण कक्षातील रणजीत माने यांची बदली करमाळा पोलीस ठाण्यात केली आहे तर् करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली सांगोला पोलीस ठाण्यात केली आहे. सांगलीचे पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमातीला अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने विविध कालावधी पूर्ण न झालेले पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीचा विचार करून बदल्या केल्याचे सांगितले."

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form