एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर कडील गहाळ झालेले विविध कंपनीचे एकुण २० अँड्रॉइड मोबाईल्स (४,००,०००/- रू) किं चे सी ई आय आर पोर्टलव्दारे व तांत्रिक पध्दतीने डी.बी. पथकाने शोध लावून कली उल्लेखनीय कामगिरी



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल चा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशीत केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख  भरत चंदनशिव यांचे मार्गदर्शनाखाली पोना/२७३ मंगेश महादेव गायकवाड व पोकॉ/१४६७ शैलेश श्रीशैल स्वामी यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी प्राप्त मोबाईलचे सी डी , एस डी आर व लोकेशनचे विश्लेषण करून तसेच सी ई आय आर पोर्टलव्दारे सन २०२४ व सन २०२५ मधील विविध कंपनीचे एकुण २० अॅन्ड्रॉईड मोबाईल (हॅन्डसेट) किं अं.-४,००,०००/- रू चे मोबाईल सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा व परराज्यातुन हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सोो, एम. राजकुमार, पोलीस उप - आयुक्त सोो, (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त सोो, विभाग ०१ प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे सोो, दुय्यम पोलीस निरीक्षक सोो,  विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/भरत चंदनशिव, पोना/२७३ मंगेश महादेव गायकवाड, पोकॉ/१४६७ शैलेश श्रीशैल स्वामी नेम. एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर, पोहेकों/अर्जुन गायकवाड, पोहेकॉ प्रकाश गायकवाड, पोना/अय्याज बागलकोटे यांनी बजावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form