महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी जलसाकार संभाजी भगत यांची वरिष्ठ वकील संजीव सदाफुले यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी जलसाकार संभाजी भगत ज्यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांचा सादरीकरण करत राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर आपला आंबेडकरी जलसाकार म्हणून ठसा उमटवला आहे. संभाजी भगत शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूरातील वरिष्ठ वकील संजीव सदाफुले यांच्यां कार्यालयास सदिच्छा भेट दिले यावेळी आंबेडकरी चळवळीवर चर्चा देखील झाली  दरम्यान ॲड.संजीव सदाफुले हे वकिली पेशा निभावत असताना सामाजिक बांधिलकी, बाबासाहेबांची चळवळ या सर्व गोष्टींचा पुरेपुर जाण ठेवून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो 




या दृष्टीने समाजातील गोरगरीब वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्याचा काम ॲड.संजीव सदाफुले यांनी केलं असून जलसाकार संभाजी भगत यांनी तोंडभरून कौतुक केले. कार्यालय भेटीच्यावेळी निरोप घेताना ॲड. संजीव सदाफुले यांना पुढील सामाजिक राजकीय तथा चळवळीतील कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रिया भगत कामगार नेते बापूसाहेब सदाफुले  ॲड.सिद्धांत सदाफुले निलेश वाघमारे आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form