दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती कटिबद्ध आहे पत्रकारितेबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय पत्रकार सुरक्षा समितीचे यंदाचे 9 वे वर्ष असून पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 2025 चा पुरस्कार हल्लाबोल न्यूज नेटवर्क चे संपादक युवा पत्रकार शब्बीर शेख यांना देण्यात आला सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे धाराशिव जिल्हा अध्यक्ष (महिला ) सारिका चुंगे सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्व्यक लक्ष्मण सुरवसे सचिव अरुण सिडगिद्दी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कबीर तांडूरे अजहर शेख संभाजी गोसावी सतीश गडकरी इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
सोलापूर