दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर -अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ३ जूनपर्यंत मुदत आहे. पण, पोर्टलची गती कमी असल्याने अर्ज भरण्यासाठी दिवसभर विद्यार्थी, पालकांना ताटकळ बसावे लागत आहे. विद्यार्थी प्रवेशासपासून वंचित राहिल्यास शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदार धरणार असल्याचा आदेश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी काढला आहे.२६ मे पासून ऑनलाइन नोंदणी सुरु झाली. सुरवातीला काहीवेळ गतीमान असणाऱ्या पोर्टलचा वेग मंदावला. सलग तिसऱ्या दिवशीची पोर्टल संथ असल्याने नेटकॅफे व महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी ताटकळत थांबून होते. रात्री उशिरा पोर्टलची गती वाढत असल्याने काहीजण ऑनलाइन नोंदणीसाठी रात्री उशिरापर्यंत जागत आहे. तरीही, उपयोग झाला नाही. राज्यभरातील २० लाख विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. बुधवारी फक्त ६, १०, ५५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. ३ जूनपर्यंत किमान १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने बैठक घेणे, जनजागृतीसह ठोस कृती मोहिम राबवा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या.
अकरावी प्रवेशासाठी 3 जूनपर्यंतच मुदत-
गेल्या दोन दिवसांपासून संथगतीने सुरू असलेले ऑनलाईन प्रवेश पोर्टल बुधवारी दुपारनंतर सुरळीत सुरू झाले. त्या दरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीसाठी लगबग सुरू होती. सोलापुरातील एकूण ५९, २७७ विद्यार्थी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले. पण, तीन दिवसांमध्ये फक्त १०, ७०० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. ३ जूनपर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.
Tags
सोलापूर