दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी तीन जण इच्छुक आहेत. दोन दिवसांत अध्यक्ष व सचिव पदासाठी नावे अंतिम होतील. ३० जून रोजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल समाप्त होत आहे. त्याच दिवशी मतदान होणार आहे, अशी माहिती सचिव अॅड. मनोज पामुल यांनी दिली. सदस्यांना १४ जून रोजी वर्गणी भरण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. १६ जून रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द होतील. १६ ते १७ जून दुपारी चारपर्यंत हरकती घेण्यासाठी तारीख दिली आहे. अंतिम यादी तयार झाल्यानंतर १८ ते १९ जूनदरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन या वेळेत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल. २० जून रोजी अर्जाची छाननी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होईल. सायंकाळी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २३ व २४ जून रोजी उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दुपारी साडेचारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. २५ जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० जून रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच या वेळेत मदत होईल. त्यानंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी होईल. १ जुलै रोजी अध्यक्ष व सचिव पदाची घोषणा होईल.
Tags
सोलापूर