दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीने चालवणं काळाची गरज असल्याचे मत डॉ.संजीव ठाकूर यांनी व्यक्त केले.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती बी ब्लॉक येथे उत्साहात साजरी केली.या कार्यक्रमासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर हे प्रमुख पाहुणे तर भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे , माजी नगरसेवक बाबा मिस्त्री ,भाजप पदाधिकारी राजकुमार पाटील , राम वाकसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या बी ब्लॉक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या तैलचित्राचे अनावरण अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील पुरुष आणि महिला कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपचे माजी शहर अध्यक्ष म्हणाले, अहिल्यादेवींची 300 जयंती साजरी होत असताना फक्त त्यांच्या प्रतिमा लावून चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणावी लागतील.पुढील पिढीवर अहिल्यादेवींच्या विचारांचे संस्कार झाले तरच चांगली पिढी तयार होईल. पुढील काळात चांगली पिढी तयार होण्यासाठी अहिल्यादेवींचे विचार सर्वांवर रुजवणे आपले जबाबदारी आहे असे मत काळे यांनी व्यक्त केले. यावेळी बिरूदेव खताळ ,प्रतिश गावडे ,सोमनाथ बंडगर ,सागर निकम ,ज्ञानेश्वर सुतार ,विलास कुदनर ,राजेश बंडगर ,स्वामीनाथ पगडे ,संध्या गावडे ,विमल बंडगर ,मधुकर देशमुख ,सिद्धराम वाघमोडे ,वैभव माने आदींसह सिव्हिल येथील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सोलापूर