महाराष्ट्र शासनाचे "१०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम" मधील शिलेदारांना प्रशस्तीपत्र बहाल ; वपोनी सुरेश निंबाळकर आणि नीलकंठ जाधवर यांचा विशेष सन्मान



 दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचे " १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम" या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण घटकाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहभाग नोंदवला होता.देवेंद्र फडवणीस, मुख्यमंत्री यांनी या उपक्रमाचे राज्यस्तरावरील विजेते यांचा निकाल सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहीर केला असून त्यामध्ये पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. याचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुंबई येथे पार पडला.दिनांक २३/०५/२०२५ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मासीक गुन्हे सभे दरम्यान अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या मुद्यावर सुधारणा, निर्गती व प्रशिक्षण घेत असताना पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महत्वाचे योगदान दिले होते. सदर योगदान देणारे शिलेदार यांच्या कामाचा गौरव व केलेल्या कामासाठी प्रशंसापत्र देण्यासाठी दिनांक २३/०३/२०२५ रोजी" संवाद" सभागृह, पोलीस मुख्यालय, सोलापूर येथे कार्यक्रम आयोजीत केला होता. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशांसपत्र देवून गौरविण्यात आले आहे.यामध्ये एलसीबी चे वपोनी सुरेश निंबाळकर आणि नीलकंठ जाधवर यांचा देखील या उपक्रमात विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांना देखील पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी, महाराष्ट्र शासनाचे या उपक्रमांमध्ये योगदान देणारे अधिकारी व अंमलदार यांच्या कामाची स्तुती केली असून यापुढे "पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण घटकाकडून अशा नावीन्यपूर्ण योजनांमध्ये सहभाग घेतला पाहिजे तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसाद करून त्याचा उपयोग पोलीसांनी आपले दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी केला पाहिजे, यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे " मत व्यक्त केले आहे.सदर गुन्हे सभा व सत्कार संभारभ संपल्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान गायक मोहम्मद आयाज यांचे ये धरती है बलीदान की या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम पेहलगाम हल्यातील मृत्युमुखी पडलेल्या निरापराध नागरिक व सेना दलातील जवानांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.सदर कार्यक्रमास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक,विजयालक्ष्मी कुरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्यासह जिल्हातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, लिपीक वर्ग व पोलीस अंमलदार हे हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form