मुख्य संपादक - अक्षय बबलाद
सोलापूर - सोलापूर येथे विजापूरनाका हद्दीत अवैध धंद्यावाल्यांचा सुळसुळाट नेहमीच पाहायला मिळतो त्यात काय नवं नाही मध्यला काही काळात ठाकरे गट शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर राज्यउत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या चालणाऱ्या कोल्ड्रिंक हाऊस अवैध परमिट रूम धाबे अश्या अस्थपनांवर कारवाई केले.यानंतर विजापूर नाका पोलिस ठाणे बघ्याच्या भूमिकेत होती की अश्या दर्शनी भागात असलेल्या अवैध धंद्यापासून अनभिज्ञ होती हे समजणे कठीणच दरम्यानच्या काळात काही कालावधी साठी वरील प्रकारचे अवैध दारू धंदे कोल्ड्रिंक हाऊस अवैध परमिट रूम बंद करण्यात आले मात्र ते काही कालावधी पुरताच पुन्हा अश्या अवैध दारू धंदे कोल्ड्रिंक हाऊस धाबे अश्या प्रकारची अवैध धंदे विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या नाकावर टिच्चून सुरू झाले आहेत. यानंतर अवैध वाळू तस्करी अवैध जुगार ऑर्केस्ट्रा बार अश्या विविध धंद्यांबाबत विजापूर नाका पोलिस ठाणे अनभिज्ञ कशी ? असा प्रश्न उपस्थित होतो त्यातच भर म्हणून कालच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने विजापूर नाका हद्दीत चालणाऱ्या स्पा मसाज सेंटरवर छापा टाकत चालत असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई केली असून बहुदा आता विजापूर नाका पोलिस ठाण्यास आपली गुपीत सूत्र ,खबरी/ बातमीदार बदलण्याची गरज दिसते कारण इतक्या मोठ्या प्रमाणात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या चालत असतील आणि विजापूर नाका पोलिस ठाणे या सर्व धंद्यानपासून अनभिज्ञ असेल तर पोलिस ठाणे नक्की करते काय?? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.कडक शिस्तीचे म्हणून घेणारे पोलिस आयुक्त यांची काय भूमिका असणार आहे. हे सोलापूरकरांसाठी औत्सुकतेच ठरणार आहे. अश्या विविध प्रकारच्या अवैध धंद्यांद्वारे सोलापूर शहराची प्रतिमा आणि युवक यामध्ये नक्कीच बिघडत असल्याचे चित्र आहे. नेहमीच सोलापूरात बेरोजगारीचे प्रमाण दिसून आले आहे.राजकीय उदासीनता आणि कुरघोड्या यामुळे सोलापूर शहर जिल्हा हे औद्योगिक क्षेत्रात भकास झाल्याचे दिसून आले आहे.त्यामध्ये आणखी सोलापूरचे खच्चिकरण करण्यासाठी लोकप्रतीनिधीनी तथा सोलापूरचे पालकमंत्री यांनी देखील आवाज उठवून आदेश देऊन सुद्धा अवैध धंद्यानी कमालीचे डोके वर काढले असून आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना वेळोवेळी लक्ष्मीचे भरगच्च दर्शन देतो त्यामुळे आमचे कोणी काही करू शकत नाही अश्या आविर्भावात असणाऱ्या अवैध धांद्यावाल्यांना नेमका अभय कोणाचा? हे समजणे कठीणच. असो सोलापूरकरांना या सर्व गोष्टी म्हणजेच अवैध धंदे, या ढिम्म प्रशासनामुळे सहन करण्याची सवयच लागली आहे.आता यावर सर्रास पणे चालू असलेल्या अवैध धंदे विशेष करून प्रतिष्ठित मानली जाणारी विजापूर नाका हद्द याकडे पोलिस आयुक्त कशाप्रकारे लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
