राजमाता सामाजिक प्रतिष्ठानतर्फे धनगर समाजाच्या वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

दैनिक_लोकशाही_मतदार
  सोलापूर - सोलापूर शहरांमध्ये रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी स्थळ : सुंदर मल्टीपर्पज हॉल , नेहरूनगर बस स्टॉप , विजयपूर रोड, सोलापूर येथे  सकाळी 10:00 वा राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याकरिता  प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहराचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे , शिवसेना (उबाठा) गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.डॉ.अजय दासरी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन होऊन वधू-वरांचे माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे . 
तरी धनगर समाजातील सर्व पोट शाखेतील इच्छुक वधू-वर व पालकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी. अशी विनंती संचालक व सन्माननीय सदस्य संयोजक रविंद्र नागणकेरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form