सोलापूर शहरात उद्या उशिरा पाणी येणार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- महापालिकेने उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची पाकणी येथे जोडणी करण्यासाठी रविवारी शटडाउन घेतले आहे. या कारणास्तव शहराचा पाणीपुरवठा रविवारी विस्कळीत होणार आहे.
समांतर जलवाहिनीतून पाणीउपसा सुरू झाला आहे. या जलवाहिनीचे पाणी अद्याप पाकणी येथे आलेले नाही. पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे वळवले जाणार आहे. या जोडणीचे काम रविवारी होणार आहे. उजनी ते सोलापूर जुन्या जलवाहिनीला लांबोटी पुलाजवळ गळती लागली आहे. या दोन्ही कामांसाठी उजनी आणि पाकणी येथील पाणीउपसा रविवारी ८ ते १० बंद राहणार आहे. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहील, असे सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांनी सांगितले. कन्ना चौक, राजेंद्र चौक, साखर पेठ, भुलाबाई चौक, मंगळवार बाजार, सोमवार पेठ, भारतीय चौक, विजापूर वेस, रहेमानिया बोळ, सरस्वती चौक, गुलजार तालीम, जोशी गल्ली, विठ्ठल पेठ, कुचन शाळा परिसर, मार्केट यार्ड परिसरात पाणी येईल.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form