जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करावी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचे निर्देश

 


 दैनिक_लोकशाही_मतदार         

सोलापूर -सोलापूर शहर व जिल्हयात मटका, डान्सबार, अवैध मद्य विक्री सह अन्य अवैध व अनाधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. पोलीस प्रशासनाने अशा अवैध व अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या संबंधिताची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करुन ते धंदे बंद करावेत, अशा सूचना राज्यमंत्री गृह(शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी  पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी दिल्या.

     पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर येथे  गृह राज्यमंत्री  योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त.एम.राजकुमार, पोलीस उपायुक्त श्रीमती दिपाली काळे, अजित बोऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले, महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्हयांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेता नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देवून त्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हयात अनाधिकृपणे गुटखा विक्री होणार नाही दक्षता घेवून  गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करावी अशा सूचानाही त्यांनी यावेळी दिल्या. 

 यावेळी पोलीस आयुक्त  एम.राजकुमार म्हणाले, सोलापूर शहरात एकूण सात पोलीस स्टेशन आहेत. तसेच वर्षात 170 मिरवणूक असतात. त्यासुरळीत पारपाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. 100 दिवसीय कृती आराखडया अभियानातंर्गत या विभागामार्फत 1100 वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे.  तसेच पोलीस प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरणेबाबत मागणी त्यांनी यावेळी केली. 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form