दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- दि.०३/०३/२०२५ रोजी शेतातील हरबरा पिकाचे रास करण्याच्या कारणावरून फिर्यादीस लोखंडी रॉडने, लाकडी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज अक्कलकोट येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.एम. एम. कल्याणकर साहेब यांनी जामीन अर्ज मंजूर केला.यात थोडक्यात हकीकत अशी की, दि.०३/०३/२०२५ रोजी फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये "तु शेतातील हरबराचे पिकाचे रास का करत आहे?" असे विचारल्याच्या कारणावरून फिर्यादीस लोखंडी रॉडने, लाकडी काठीने व लोखंडी खुरप्याने मारहाण केल्या प्रकरणी फिर्यादी सोमनाथ मुनाळे यांनी दि.११/०३/२०२५ रोजी आरोपी नामे १. संतोष मुनाळे २. सिद्धराम मुनाळे ३. शिवानंद मुनाळे ४. जनाबाई मुनाळे ५. विजायलक्ष्मी मुनाळे यांच्या विरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता चे कलम ३५२,३५१, (२),१९१(३),१९१(१), १९०,१८९(२),११८(२) प्रमाणे फिर्याद दिलेली होती.सदर आरोपी यांनी ॲड. आकाश गंगाधर कोळी यांच्या मार्फत जामीन मिळणेकरीता प्रथमवर्ग न्याय-दंडाधिकारी अक्कलकोट यांच्याकडे दाखल केला. सदरचा जामीन अर्जावर मे. न्यायालयाने आरोपींच्या विधीज्ञांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपी यांचा जामीन अर्ज मंजूर केला.यात आरोपीं तर्फे ॲड.आकाश कोळी, ॲड. श्रीकांत भिसे यांनी काम पहिले.
.jpeg)