नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहन चालकांचे परवाने रद्द

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसाय तेजित चालण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर- वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. यात मद्य प्राशन करुन वाहन चालवणे, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग व अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई सरू करण्यात आली आहे.मागील पाच महिन्यात एकूण ८० वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. यात जानेवारीमध्ये ३८, फेब्रुवारीमध्ये ७, मार्चमध्ये १४, एप्रिलमध्ये ८, मेमध्ये १३ असे एकूण ८० वाहन चालकांचे वाहन परवाने रद्द केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form