दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाढदिवस, मिरवणूक, सण उत्साहाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते, नेते, पुढारी, भावी नगरसेवक, भावी आमदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तदानाच्या नावाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात रक्त संकलन करणारे, महात्मा बसवेश्वर ब्लड बँक, अक्षय ब्लड बैंक, सिध्देश्वर ब्लड, मेडिकेयर ब्लड बैंक, शिव शंभो ब्लड बँक, अतहर ब्लड बँक, या ब्लड बँकच्या कॅम्प लावले जात आहे वाढदिवस, जयंती, सन, उत्साह मध्ये जे रक्तदान शिबिराचा आयोजन केला जात आहे त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांना या ब्लड बँकेच्या वतीने अनेक भेटवस्तू गिफ्ट देऊन लाखो रुपयाचा रक्त संकलन खूप जोरात होत आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यातील या ब्लड बँकेमध्ये शिबिरामध्ये रक्तदान घेऊन हे रक्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या नागरिकांसाठी वापर न होता लाखो करोडो रुपयांचा हा रक्त अवैधरीत्या सोलापूरच्या बाहेर तस्करी होत आहे. या अवैद्यरीत्या तस्करी होणारे रक्तामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर ब्लड बँक,अक्षय ब्लड बैंक, सिध्देश्वर ब्लड, मेडिकेयर ब्लड बैंक, शिव शंभो ब्लड बैंक, अतहर ब्लड बैंक, शामिल आहे. लाखो करोडो रुपयांचा अवैधरित्या रक्त तस्करी खूप मोठ्या प्रमाणात या ब्लड बँकेच्या वतीने होत आहे. पुणे व सोलापूर प्रशासनाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील ब्लड बँकेच्या संचालकाची मिटींग आयोजित केली होती. त्या मिटींगमध्ये असा ठराव करण्यात आला होता की कोणत्याही ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूच्या (गिफ्ट) स्वरूपात लालच देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला होता, परंतु मिटींग झालेल्या दुसऱ्याच दिवशी वरील पैकी ब्लड बँकेने टिफीन, जरकीन, इतर भेट वस्तू देऊन ठरावाचे व आदेशाचा भंग केला. सोलापुर पुणे आयुक्त अन्न व औषध प्रशासन नियमांचे व आदेशाचे पालन न करणारे व अवैधरीत्या रक्त तस्करी करणारे ब्लड बँकेची चौकशी करून कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख जिल्हा परिषद पूनम खेड येथे बे मदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे.
