दैनिक लोकशाही मतदार चा दणका ; करमाळा शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायास भरभराटी मिळविण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952


दैनिक_लोकशाही_मतदार

करमाळा (प्रतिनिधी)- विशाल जाधव - करमाळा शहरातील सर्वे रस्ते खराब झाले आहे दत्त मंदिर पासून ते कॉलेज रोड ते कोर्ट व मेन रोड बस स्टॅन्ड ते भवानी नाका ते पोथरे नाका व इतर रस्ते खराब झाले आहे त लवकरात लवकर दुरुस्ती करा अशी लोकांची मागणी आहे. व रस्ता खराब असल्यामुळे मोटरसायकलचे व गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे रहदारी करत असताना मोठी तारेवरची कसरत होत आहे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.ज्यामुळे संभाव्य अपघात होण्याचे शक्यता जास्त असल्याने जीवित हानी देखील नाकारता येत नाही.



 ' रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता'अश्या  मथळ्याखाली बातमी दैनिक लोकशाही मतदार चे करमाळा तालुका प्रतिनिधी विशाल जाधव यांनी लोकशाही मतदार या पोर्टल वर वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित यंत्रणा जागी होऊन वृत्ताची दखल घेत तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले असून स्थानिक नागरिकांकडून लोकशाही मतदारचे कौतुक होत आहे. नागरिकांना या रस्ता दुरुस्ती कामामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.ज्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात थांबणाऱ्या पाण्यामुळे संभाव्य धोके टळले जाण्याची शक्यता कमी झाल्याची निश्चिती होईल.




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form