करमाळा शहर व तालुक्यात बकरी ईद निमित्त अहमद कुरेश माजी उपनगराध्यक्ष यांचे महत्त्वपूर्ण आवाहन

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायास भरभराटी मिळविण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952


दैनिक_लोकशाही_मतदार

करमाळा (प्रतिनिधी)-  दि. 7 जून रोजी असलेल्या बकरी ईदनिमित्त करमाळा शहर तालुक्यातील मुस्लीम बांधवांसाठी अहमद कुरेश माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. बकरी ईद सकाळी ८ वाजता होईल. अशी माहिती करमाळा शहरातील शहर अहमद कुरेशी यांनी दिलेली आहे. तरी शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुरेशी यांनी केले आहे.तसेच समाज बांधवांनी ईदची नमाज पठण झाल्यानंतर शांततामय वातावरणात कुर्बानी करावी. व कुर्बानी केल्यानंतर कोणते ही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडिया वर प्रसारित करु नये. तसेच कुर्बानी केल्यानंतर परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा. त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करावे. व मोठ्या भक्तिभावाने ईदचा सण साजरा करावा. असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले आहे. यावेळी जमीर सैयद ख्वाजा हुसैन कुरेशी राजा कुरेशी रियाज कुरेशी असलम उस्ताद नजीर अहमद कुरैशी इस्रायल कुरेशी   आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form