दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- यातील हकीकत अशी की, दि.11/04/2025 रोजी सायंकाळीं 06/45 वा चे सुमारास सावरकर चौक पंढरपुर येथे असलेल्या राज ज्वेलर्स या दुकानातुन एक अनोळखी इसम याने आमची सर्वांची नजर चुकवुन 15.05 ग्रॅम वजनाचे 1,50,000/- रु. किंमतीचे मिनीगंठण हे लबाडीने चोरून नेले आहे म्हणून त्याचे विरुद्ध पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता चे कलम 303(2) प्रमाणे फिर्याद दिलेली होती.सदर आरोपी यांनी जामीन मिळणेकरीता प्रथमवर्ग न्याय-दंडाधिकारी पंढरपूर यांच्याकडे अर्ज दाखल केला. सदरचा जामीन अर्जावर मे. न्यायालयाने आरोपींच्या विधीज्ञांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपी यांचा जामीन अर्ज मंजूर केला.यात आरोपीं तर्फे ॲड. अरविंद देडे, ॲड. सागर हंबीरराव, ॲड.रोहित थोरात, ॲड.व्यंकटेश शिंदे यांनी काम पाहिले.
Tags
सोलापूर
.jpeg)