माध्यमिक शिक्षण विभागात विठ्ठल ढेपे, तर अधीक्षक संतोष फाटके यांनी स्वीकारला पदभार

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायास भरभराटी मिळविण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात यापूर्वी वेतन अधीक्षक म्हणून काम पाहिलेले विठ्ठल ढेपे हे माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला.. तसेच अधीक्षक वर्ग 2 म्हूणन संतोष रामदास फाटके आणि  सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून अनिल जगताप यांनी स्वीकारला पदभार..  आणि शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन  सत्कारही माध्यमिक विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.!महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सेवा ब गट मधील अधिकाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या केल्या होत्या. या बदल्यामध्ये ढेपे यांची गडचिरोलीला बदली झाली होती. आता पुन्हा सहा दिवसांतच शिक्षण विभागाने यात बदल करीत ढेपे यांची सोलापुरात नियुक्ती केली आहे. आठवडाभरात झालेल्या या चमत्काराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मागील दोन ते तीन वर्षांपासून ढेपे हे शिक्षण विभागात वेतन अधीक्षक म्हणून काम पाहत होते. ते मूळचे बाळे येथील आहेत. यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिका शिक्षण मंडळात प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.यावेळी  माध्यमिक  शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, लिपिक म्हणून रवीकांत कोरे, श्रीकांत धोत्रे, राज महम्मद शेख, मनोज साबळे,  प्रभाकर राजगुरू, अनिल पाटील, फिरोज शेख आदी माध्यमिक शिक्षण विभागातील सर्वच लिपिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post