घरगुती कारणामुळे वसंत विहार येथे वकिलाने केला आपल्या पत्नीचा खून

दैनिक_लोकशाही_मतदार
 सोलापूर (प्रतिनिधी)- शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसंत विहार, स्वराज्य विहार ब्रिजजवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वय ४४ यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय ३४ यांचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. ही घटना आज सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत राजहंस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पत्नी भाग्यश्री यांच्याशी भांडण झाल्याने त्यांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रशांत राजहंस हे व्यवसायाने वकील असून, त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form