ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेसाठी सरनाईकांचं अल्टिमेटम

तुळजापूर- तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर देखील मकोक अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिले आहे. "पंधरा ऑगस्टला ड्रग्जबाबत बैठक आहे मात्र त्यापूर्वी सर्व आरोपींना अटक करा" अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिल्या आहेत. प्रताप सरनाईक हे पालकमंत्री आहेत. या प्रकरणातील तपासाला गती देण्यासाठी आणि फरार आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ड्रग्जच्या या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form