पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ; खंडणी सारखे गंभीर गुन्हे चिंतनीय बाब प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रतिपादन

दैनिक_लोकशाही_मतदार
सांगोला (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून राज्य सरकार मुख्यमंत्री राज्यपाल जिल्हाधिकारी यांच्याकडे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आंदोलने उपोषणे निवेदने व पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत आहे पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुक्याची बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण मंगल कार्यालयाचे बंडू उर्फ पांडुरंग पाटील हे होते या बैठकीत जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास आधीस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वाहनांना टोल मधून सूट मिळणे त्याचबरोबर पत्रकारावर होणारे हल्ली धमकी मारहाण तसेच खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने निपक्ष चौकशी करणे बाबत चर्चा करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन तालुकाध्यक्ष चंद्रकांत ऐवळे कार्याध्यक्ष वाहिद अत्तार सचिव बबन चव्हाण सहकार्याध्यक्ष शुभम ऐवळे उपाध्यक्ष शशिकांत हातेकर खजिनदार दिक्षा चंदनशिवे तर सांगोला शहर अध्यक्ष राजू बाबर सचिव जयराम रणदिवे कार्याध्यक्ष विकास बाबर उपाध्यक्ष कैलास हिप्परकर यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे चिंतनीय बाब*- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार 
 पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना आपल्या माध्यमातून तो जनतेसमोर आणत असतो बातमी लावण्यावरून खंडणी सारखे खोटे गुन्हे दाखल होणे ही अतिशय चिंतनीय बाब असून लोकशाहीला निश्चितच मारक आहे निरपेक्ष निर्भीड आणि सडेतोड पत्रकारिता करत असताना चुकीच्या पद्धतीने खंडणी सारखे गुन्हे दाखल होणे हल्लीच्या पत्रकारितेला परवडणारे नाही याचा सामाजिक राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा खंडणी सारखे खोटे गुन्हे दाखल केल्याने पत्रकारांची प्रतिमा खराब होते परंतु प्रामाणिक पत्रकार अशा खोट्या गुन्ह्याला कधीच घाबरत नाही सांगोला तालुक्यातील खंडणी सारखे गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांच्या संदर्भात पत्रकार सुरक्षा समिती वतीने लवकरच सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असून खंडणी प्रामाणिक पत्रकारांवर सूडबुद्धीने खंडणी सारखे गंभीर दाखल दाखल करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हावी झालीच पाहिजे बाबत पत्रकार सुरक्षा समिती आता गप्प बसणार नाही ज्या पत्रकारावर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला आहे याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झागालिब मुजावर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form