पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर सालार टोळीतील ६ जणांवर मोक्का


दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे आपल्या टीमसह अॅक्शन मोडवर असून, गुन्हेगारांवर तडीपारीबरोबरच मोकोका अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. शनिवारी अशीच मोठी कारवाई करून शहरातील नामचीन अशा सालार टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, येथील फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसुफ शेटे, सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड व वसीम ऊर्फ मुकरी
अब्दुल रहीम सालार यांनी मागील १० वर्षांत संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून स्वतःच्या व टोळीच्या अवैध आर्थिक फायद्यासाठी तसेच परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन खून व खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे ७ दखलपात्र गुन्हे केले असून, सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सालार टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (अ), ३ (२). ३ (४) या कलमाअंतर्गत कारवाई केली आहे.

*कारवाई झालेले सर्व आरोपी*
हे विजापूर वेस परिसरातील मुल्लाबाबा टेकडी, पेंटर चौक या परिसरात राहणारे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सालार कंपनीचा विजापूर वेस परिसरात गुन्हेगारीचा दबदबा होता.

*सालार गँगच्या दहशतीचा बहाद्दर पोलिस आयुक्तांनी केला अंत*
नई जिंदगी परिसरात दहशत निर्माण केल्याने, घटना घडली त्यावेळी या परिसरात जमलेले लोक घाबरून पळून गेले होते. घटनेन े घाबरलेल्या दुकानदारांनी आपली दुकान े बंद करून घेतली होती. तर रहिवासियांनीदेखील आपापली घरे बंद करून घेतली. संशयित आरोपी फैसल सालार याने, त्याच्या हातातील चाकुन े फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना, सोहेल सय्यद त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यान े ते खाली पडल्यानंतर इतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. घटनेतील संबधितांवर मोक्का लावून सालार गैंगच्या दहशतीचा बहाद्दर पोलिस आयुक्तांनी जणु काही अंत केल

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form