सराईत गुन्हेगार नाईंट्या नलावडे स्थानबद्ध, येरवडा तुरुंगात रवानगी


दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)-  विनयभंग, जबरी चोरी, खंडणीसारखे सात दखल गुन्हे दाखल असलेल्या ओंकार संतोष नलवडे उर्फ नाईंट्या यास पोलिस आयुक्तालयाने स्थानबद्ध केले. नलावडे (वय २५, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, दमाणी नगर) याची रवानगी पुणे येरवडा जेलमध्ये केली आहे. चालू वर्षात पोलिस आयुक्तांकडून नाईंट्या नलावडे एमपीडीएअंतर्गत करण्यात आलेली
ही १२ वी कारवाई आहे. नाईंट्या यास गुन्हेगारी कारवायांवर अंकुश बसवण्यासाठी सन २०२१ व २०२२ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याच्या वर्तनात कोणताच बदल झालेला नाही आणि त्याने गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या होत्या. त्यामुळे स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव फौजदार चावडी पोलिसांकडून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी स्थानबद्धतेचा आदेश काढला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form