करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी;दिवसा घरफोडी प्रकरणातील सोने हस्तगत

 करमाळा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील कंदर येथे दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सुमारे १,५०,००० किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. करमाळा तालुक्यातील कंदर येथील रहिवाशी अभिजीत जीवन सरडे (वय-२७) यांच्या राहत्या घरी दि. ०६/१२/२०२४ रोजी १२ ते २.३० वा.दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाज्याची कडी उचकटून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून पोबारा केला, त्या अनुषंगाने अज्ञात चोरट्या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा निरंतर तपास चालू असताना तपासामध्ये सदरील गुन्हा रामेश्वर जंगल्या भोसले (वय -२५) रा. पांडेगव्हाण, ता-आष्टी, जि-बीड याने केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस अटक करून चोरी केलेल्या दागिन्यापैकी १,५०,०००/- रु. किंमतीचे सोन्याची कर्णफुले व सोन्याची ठुशी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी रामेश्वर भोसले याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, म.सहा.पो.नि गिरीजा मस्के पो.उप.नि प्रशांत मदने, पो.ह अजित उबाळे, पो.ना वैभव ठेंगल, पो.ना मनीष पवार, पो.शि सोमनाथ गावडे, पो.कॉ योगेश येवले, पो.कॉ मिलिंद दहीहांडे, पो.कॉ अर्जुन गोसावी, पो.कॉ अमोल रंदील, पो.कॉ रविराज गटकूळ तसेच अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि गळवे व पो. शि व्यंकटेश मोरे सायबर पोलीस गाणे यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form