दैनिक_लोकशाही_मतदार
बार्शी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 60 लाख रुपयांचा तब्बल 692.945 किलो गांजा जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई बार्शी तालुक्यात भोयरे गावाजवळ करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, आगळगाव ते बार्शी रोडवर अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना एम एच 14 इ सी 4536 क्रमांकाची कार, एम एच 14 इ एम 9833 क्रमांकाचा टेम्पो आणि एम एच 43 व्ही 8947 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करताच, कार आणि ट्रकचे चालक पळून गेले. मात्र, टेम्पोचा चालक अंकुश दशरथ बांगर (रा. भोयरे, ता. बार्शी) पळून जात असताना, पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले.पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून 692.945 किलो गांजा, एक ट्रक, एक टेम्पो आणि एक कार असा एकूण 1 कोटी 60 लाख 58 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, ही टोळी आंतरराज्यीय असल्याचेही समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोहेकों धनराज केकाण, पोहेकों अभय उंदरे, पोहेकों अरुण डुकळे, पोना सागर शेंडगे, पोकों सिध्देश्वर लोंढे, पोकों युवराज गायकवाड, पोकों राहुल बोंदर, पोका उत्तरेश्वर जाधव, पोकों मंगेश बोधले, पोकॉ शैलेश शिंदे, पोकों ओमप्रकाश दासरे, पोकों लोकरे, पोका धनराज फत्तेपूर, पोका अविनाश पवार, पोकों वैभव भांगे, पोकॉ रतन जाधव, पोकों राहुल उदार, पोकों सुनील सरडे, पोकों रमेश माने, पोका पटेल, पोहेकों तानाजी डाके, चालक एएसआय केशव माशाळ, चापोकों लक्ष्मण चिठ्ठलवाड, चापोकों वैभव माळी यांचा समावेश होता.
