सोलापूर जिल्ह्यातून दि. 29 ऑगस्ट-2025 च्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी 25 हजार गाड्या जाणार

 


दैनिक-लोकशाही-मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-  संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवानी या आंदोलनामध्ये मुंबईला येण्याचे आव्हान केले आहे. सकल मराठा समाज सोलापुर शहर व जिल्ह्यातून 25 हजाराच्या आस-पास दु-चाकी, चार-चाकी मालवाहतुकीचे वाहने ट्रक्टर, पाण्याचे टँकर व अॅब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने दि.28 ऑगस्ट-2025 रोजी वार-गुरुवार सकाळी 10.00 वा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करुन मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. खालील मागण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा पुढील होणाऱ्या अनर्थास हे सरकार जबाबदार राहील असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे. या पत्रकार परषदेस सकल मराठा समाजाचे माऊली पवार समाधान ढवण डॉ.प्रमोद पाटील ऍड. श्रीरंग लाळे महेश पवार कोताडे सचिन टिकते आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या :- 

1) सरकारने सगेसोयरेची अधिसूचना काढून कायद्यात रूपांतर करण्याचे मान्य केले होते, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट अभ्यास करून लागू करण्याची भूमिका देखील सरकारनेच घेतली होती यामुळे यामध्ये आता सरकारनेच भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी असताना सरकारने SEBC हा ओबीसी अंतर्गत प्रवर्ग बनवून 10% आरक्षण देणे आवश्यक होते मात्र सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी बाहेरील घटनाबाह्य व बेकायदेशीर प्रवर्ग बनवून फसवे आरक्षण दिले आहे.

2) ओबीसी तरुनांवर आंदोलनात दाखल गुन्हे सरकारने तात्काळ मागे घेतले मात्र मराठा आंदोलकांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झालेला असताना त्यांच्यावर खटले भरले आहेत.

3) ओबीसीना शालेय व उच्च माध्यमिक व पदवी शिक्षणासाठी जवळपास 7200 कोटी रुपये दिले जातात तर मराठा समाजाला फक्त 200 ते 300 कोटी दिलेले जातात.

4) अण्णासाहेब पाटील महामंडळ 1.5 लाख तरुणाना कर्ज भेटले मात्र ते गेल्या 7 वर्षात सध्या सरकार चार चार महीने व्याज परतावा देत नाही व बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. 15 ते 16 लाख तरुणानी 7 वर्षात अर्ज केल्यावर 1.50 लाख लोकांना कर्ज भेटले आहे हे वास्तव आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form