ताडदेवमधील वेलिंग्टन हाइट्स इमारतीतील रहिवाशांसाठी धावून आले देवाभाऊ : मंत्री लोढा यांनी मानले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार



मुंबई (ताडदेव) - ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे.तपासाअंती स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व संबंधित फाईल रखडलेल्या होत्या.रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. या निर्णयामुळे वेलिंग्टन हाइट्समधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या प्रसंग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यावेळी लोढा यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांची चूक नसताना त्यांना शिक्षा होणार नाही, याची मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली भूमिका स्तुत्य आहे. याकरिता मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. जिथे कुठे जनतेवर अन्याय होईल, तिथे जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी देवाभाऊ त्यांच्या सोबत असतील.”

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form