सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरात सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर उत्तर १, २,३ व दक्षिण सोलापूर या चारी कार्यालयामध्येमालमत्ता व्यवहारांची नोंद विवाह नोंदणी, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी, भाडेकरार किंवा इतर कायदेशीर दस्तऐवजांची नोंदणी करणे हे या कार्यालयाचे मुख्य काम आहे. दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारणे आणि त्याचे संकलन करणे. नोंदणी झालेल्या दस्तांचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात जतन करणे आणि त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे. दस्तऐवजांमध्ये काही चुका असल्यास, त्या दुरुस्त करण्यासाठी मंजूरी देणे. नागरिकांना दस्त नोंदणीशी संबंधित असलेल्या अडचणी आणि समस्या सोडवणे.या सर्व कामांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिक या कार्यालयात येतात.परंतु या सर्व कार्यालयामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की कार्यालयात अनधिकृतपणे जनतेकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे फाईल बघून झिरो कर्मचारी व अनेक एजंटांकडून प्रत्येक कामांचे शंभर रुपये पासून पाच हजार रुपये पर्यंत व तसेच इतर कागदपत्र कमी असल्यावर हे आकडेवारी वाढत जातात.अशा प्रकारे अनधिकृत पणे झिरो कर्मचाऱ्यांच्या वतीने भ्रष्टाचार सुरू आहे.या कार्यालयात हे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.या कार्यालयात या भ्रष्टाचाराच्या विरोधात व झिरो कर्मचाऱ्यांवर कारवाई करा म्हणून सोलापूर नागरी समस्या कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे दिनांक : 25/07/2025 पासून तक्रारी अर्जाच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता सादिक शेख यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी दिनांक 01/08/2025 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन, सोलापूर उत्तर 1,2,3 व दक्षिण सोलापूर या चारी कार्यालयाला सदर विषयास कारवाईबाबत पत्र देखील दिला होता.परंतु 25 दिवस निघून गेले आत्तापर्यंत या विषय वर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन, चे चारही कार्यालयाच्या वरिष्ठांनी आत्तापर्यंत कुठलीही ठोस कारवाई न करता कानाडोळा केला आहे.सादिक शेख यांच्या तक्रारीवर जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी जे पत्र ज्या अधिकाऱ्यांना पाठवून दिला होता याला देखील या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.म्हणून सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर उत्तर १, २,३ व दक्षिण सोलापूर या चारी कार्यालयामध्ये झिरो कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांची तात्काळ हकालपट्टी करा, व तसेच कार्यालयात दररोज अनधिकृतपणे हजारों रुपये गोळा करून जनसामान्य नागरिकांची लूट करून या कार्यालयात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा म्हणून सोलापूर नागरी समस्या कुर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी दिनांक 26 जानेवारी पासून जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे.माध्यमांशी बोलताना सादिक शेख म्हणाले आहे की जोपर्यंत या कार्यालयामध्ये झिरो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होत नाही व तसेच या कार्यालयात दररोज अनधिकृतपणे हजारों रुपये गोळा करून जनसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांचा हे बेमुदत धरणे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार.जर तात्काळ प्रशासनाने यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोलापूर सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन, उत्तर सोलापूर 1,2,3 व दक्षिण सोलापूर च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा सादिक शेख यांनी आहे.
