मंगळवेढ्यात डीवायएसपी बसवराज शिवपुजेयांनी स्वीकारला पदभार ;आमदार समाधान आवताडे यांनी केले सत्कार


दैनिक_लोकशाही_मतदार
मंगळवेढा :उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी नुकताच मंगळवेढ्याचा पदभार स्वीकारला. तत्कालीन डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांची बदली झाल्याने येथील जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र शासन गृहविभागाने पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून यामध्ये डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांची बदली अन्यत्र झाल्याने त्यांच्या जागी श्रीरामपूर येथून डॉ. बसवराज शिवपुजे हे आले. पदभार घेतल्यानंतर कार्यालयात बैठक घेऊन कामकाजाबाबत आढावा घेतला. डॉ. शिवपुजे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आतापर्यंत गडचिरोली, ठाणे, अकलूज आदी ठिकाणी सेवा बजावली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form