दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- राज्यामध्ये विनापरवाना अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्हयांच्या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण व प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी अवैदयरित्या, विनापरवाना शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचित केले होते. त्यावरून पोनि संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणणे कानी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.दिनांक ०९.०८.२०२५ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना बातमी मिळाली की, तीन इसम त्यांचे कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून ते एका निळ्या रंगाचे स्कॉर्पीओ चारचाकी वाहन क्रमांक MH 12 CY 5041 या वाहनातुन कुंभारी येथून निघून मौजे वळसंग रडे रवाना झाले असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.सदरच्या माहितीच्या अनुशंगाने सपोनि विशाल वायकर यांचे पथक सोलापुर ते वळसंग महामार्गावर कारवाई करता रवाना करण्यात आले. वळसंग हद्दीतील वळसंग दाडा हॉटेलव्या अलीकडे ५०० मीटर अंतरावर बातमीप्रमाणे एक स्कॉर्पीओ वाहन मिळुन आल्याने सदर टिकाणी सापळा रचुन संशयीत इसम्मांना ताब्यात घेतले असत त्यांच्या ताब्यात एक सिल्वर रंगाचे धातुचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल किं. अं. ५०,०००/-, एक जिवंत काडतुस किं.अं. २००/- व एका निळया रंगाचे स्कॉर्पीओ चारचाकी वाहन क्रमांक MH 12 CY 5041 किं.अं. ५,००,०००/- तसेच दोन मोबाईल १) विवो कंपनीचे अं. किं. १२,०००/- व २) सॅमसिंग कंपनीवे १०,०००/- असे एकूण ५,७२,०००/- किंमतीचे मुद्देमाल मिळून आल्याने, सदरचे गावठी पिस्टल हे विक्री करण्यासाठी आणले असलेबाबत सागितल्याने सदर तीन्ही इसमांविरूध्द वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय शस्त्र अधि. १९५९ कलम ३,७,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.नमुद आरोपीतांना सपनि/वायकर यांनी विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता सदर आरोपीतांनी त्यांच्या साथीदारासह वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे होटगी येथील सराफ दुकानाचे शेटर उचकटुन घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदरचे घरफोडी करताना वापरलेले स्कॉर्पीओ वाहन शिरवळ जि. सातारा वेथुन चोरी केल्याचे व एक पांढ-या रंगाचे ईको कार उरळी कांचन येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३७०/२०२५ भारतीय शस्त्र अधि. १९५९ कलम ३,७,२५ प्रमाणे दाखल तपासा दरम्यान अक्षयसिंग बिरुसिंग जुनी वय. २१ वर्षे, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे याने त्याच्या साथीदारासह वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. ३६२/२०२५ बीएनएएस क.३३१ (४), ३०५९ (अ) ३(५) गुन्हयानी कबुली देवून त्यातील गेला माल पैकी ४२७ ग्रॅम वजनाचे बाजारभावाप्रमाणे किं. अं. ४९,१०५/- रु किंमतीचे चांदीचे दागिने काडून दिल्याने तपासकामी जप्त करण्यात आले असुन असे एकूण ६,२१,१०५/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग विलास यामावार, व.पो.नि. संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विशाल वायकर, पोसई सुरज निंबाळकर, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश कारटकर, पोहेकों/सलीम बागवान, पोहेकों/विजय भरले, पोहेकों/विरेश कलशेट्टी, मपोहेकॉ/६६८ जाधव, पोलीस शिपाई / बाळराजे घाडगे, सागर ढोरे-पाटील, अन्वर अत्तार, हरिष थोरात, राहुल दोरकर, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, चापोकों/दिलीप थोरात, सुनिल पवार तसेच वळसंग पोलीस ठाणे कडील सपोनि अनिल सनगल्ले, पोसई रविराज कांबळे, पोकॉ/१००० व्हनमोरे यांनी बजावली.
