'लोकमान्य'च्या श्रींचीभक्तीभावाने प्रतिष्ठापना

 


दैनिक-लोकशाही-मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- शहरातील पारंपरिक मर्दानी खेळ व लेझीम साठी नावाजलेले पत्रा तालीम तरुण मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या श्री पणजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. बुधवारी, पत्रा तालीम येथे मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे व महामंडळाचे अध्यक्ष दत्ता भोसले ,बापू जाधव ,प्रवीण इरकशेट्टी यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम पार पडला.दरम्यान, मंडळाकडून 21 किलो चांदी श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आली.यावेळी गणपती मोरया मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला .पत्रा तालीमचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, राजेंद्र घुले, शिवाजी चव्हाण, ॲड. राम कदम सह मंडळाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form