दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर / मुंबई :- महादू पवार- भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मानव मुक्तीच्या लढा ते आयुष्यभर लढले आणि त्यांनी जिंकून दाखवला. त्यांच्या हायातीमध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली परंतु त्याआधीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र हा पक्ष सक्षम झाला नाही या उलट अन्याय अत्याचार प्रचंड वाढले त्या विरोधात एक बुलंद आवाज पुढे आला त्यालाच दलित पॅंथ असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या मानव मुक्तीच्या लढ्याला एक आक्रमकता देऊन दलित पॅंथर चळवळीने संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळवला आणि या चळवळीने एक प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात दरारा निर्माण केला. तरुणाने संपूर्ण तारुण्य वाहून दिले त्यापैकी सोलापूरचे पँथर अंबादास शिंदे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. अंबादास शिंदे यांची दोन वर्षांपूर्वी माझी ओळख झाली आणि त्यांनी दलित पॅंथर संघटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला या संघटनेचा सुवर्ण महोत्सव त्याने सोलापूर मध्ये साजरा केला त्या कार्यक्रमांमध्ये मी स्वतः उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दलित पॅंथर या संघटनेची भारत देशामध्ये नितांत गरज आहे, तरुणांमध्ये जोश उत्साह आणि पॅंथरच्याच्या काम करण्याच्या मोठ्या देशात आणण्यासाठी भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र या संघटनेची स्थापना करून त्यांनी एक जन आंदोलन उभ करण्याचा निर्णय घेतला त्या माध्यमातून त्यांनी गेली दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणी उभी केली. या संघटनेमार्फत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले यावरच ते थांबले नाहीत तर त्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट बाबत सरकार आणि प्रशासनाच्या दिलाय कारभारावर ताशेरे वडले आणि अत्याचारित पिढी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढत आहेत, वृत्तपत्र साहित्य लिखाण आणि बौद्ध धम्माचा प्रचार हा त्याने घेतलेला वसा आजही कायम टिकवून ठेवला आहे. समाजातून त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे त्याचबरोबर त्यांच्या दिवंगत पत्नी यांनी त्यांना प्रचंड साथ दिले त्यांच्या मुली आणि मुलगाही त्यांना त्यांच्या या चळवळीला पडदे आणून हातभार लावत आहे याबाबत त्यांचेही कौतुक करावे लागेल, तरुण वर्गामध्ये दलित पॅंथर बाबत निर्माण झालेले आकर्षण त्याची गरज ओळखू आणि प्रत्यक्षात अंबादास शिंदे यांनी दलित पॅंथर मध्ये स्वतःच्या अंगावर केसेस घेऊन केलेली आंदोलने त्याचबरोबर त्यांचे सोलापुरातील नामांतर लढ्यासाठी काढलेला नग्न मोर्चा आजही इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद झालेला आहे, दलितांचा संघटनेच्या मार्फत तरुण वर्गामध्ये नेतृत्व उभे रहावे त्यासाठी ते आजही त्यांच्या 80 व्या वर्षांमध्ये कार्यरत आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करावा लागेल. मुंबईमध्ये त्यांनी त्यांचा कार्यक्रम घेऊन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्व गुणाची दखल घेण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोळावे वंशज बाळासाहेब फत्तेसिंग पाटील यांना दलित पॅंथरचे अध्यक्ष पद देऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यानंतर चळवळीतला जोश त्यांच्या विसाव्या वर्षी जसा होता तसा आजही त्यांच्या वर्षातील दिसत असल्याबद्दल आमच्यासारख्या तरुण वर्गासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. दलित पॅंथरचा दुसरा वर्धापन दिन पुणे येथे मौलाना आजाद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला मी माझ्या सहकाऱ्यांसह आवर्जून उपस्थित झाला होता त्यावेळी महाराष्ट्रातून अनेक शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी पॅंथरची सध्याची परिस्थिती लक्षात घेता का गरज आहे याचे महत्त्व पटवून दिले. पॅंथर अंबादास शिंदे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी चळवळीचा जोश उत्साह लिखाण ऊर्जा कमी होऊ देणार नाही असा निर्णय घेऊन ते सामाजिक आंदोलनामध्ये पुढे आले आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या या उसाला हातभार लावून सहकार्य करून त्यांचे प्रोत्साहन वाढवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अंबादास शिंदे साहेब यांना शुभेच्छा देऊन त्यांना क्रांतिकारी जय भीम.
Tags
सोलापूर