दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर | संपादकीय - अक्षय बबलाद :- आपण पहातो की,सोलापूर शहरातील संपूर्ण फुटपाथचा दुरूपयोग होताना दिसतो.ह्या सर्व बाबी प्रशासन स्थानिक प्रशासन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो.पुटपाथ म्हणजे पादचाऱ्यांनी पायी चालण्याची जागा.परंतु सध्याच्या परिस्थितीत शहरातील जणुकाय दुकानदारांनी फुटपाथवर आपला कब्जा केला की काय असे चित्र सर्वत्रच दिसून येते.शहर भागात मुख्यतः विशेष महत्त्वाच्या ठिकाणी वाढते ट्राफीक,पार्किंगची समस्या आणि फुटपाथवर अवैध व्यवसाय यामुळे पायदळ घालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते व याचा परिणाम दुर्घटनेमध्ये होतो. फुटपाथवरुन चालु शकत नाही,कारण तिथे दुकाने/ हातगाड्या लागलेल्या असतात, वाढत्या ट्राफीकमुळे रस्त्यांनी मोठी गर्दी असते या सर्व अडचणींमध्ये पायदळ चालणारे आबालवृद्ध,विद्यार्थी व सर्वसामान्य अडकतात अशा परिस्थितीत सर्वांनाच घरी जाण्याची घाई असते.अशा कठीण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना सुध्दा ओढावू शकतात आणि अशा घटना झाल्या सुध्दा आहेत.अनेकदा पायदळ चालणाऱ्यांना मागून एखादे वाहन येते आणि दुर्घटना करून निघून जाते.यात दोषी कोण? पायदळ चालणारे म्हणावे की वाहन चालविणारे! माझ्यामते यात मुख्य दोषी म्हणजे स्थानिक प्रशासन कारण फुटपाथचा योग्य आणि सटीक उपयोग जर झाला तर आणि फुटपाथ पायदळ घालणाऱ्यांसाठी मोकळी केली तर पायदळ घालणाऱ्यांच्या ९५ टक्के दुर्घटना आपोआप थांबेल. प्रशासन / पोलीस प्रशासन (वाहतूक शाखा)वाहन चालकांचे लायसन्स , हेल्मेट, कागदपत्र विचारतात मग पायदळ घालणाऱ्यांना फुटपाथवर चालण्याचे का सांगत नाही!कारण फुटपाथवर व्यावसायिकांनी पुर्णपणे अतिक्रमण केले आहेत.त्यामुळे सरकारने, प्रशासनाने व स्थानिक प्रशासन पायदळ
चालणाऱ्यांच्या वाढत्या दुर्घटना पहायला संपूर्ण नागरिकांसाठी राज्यातील संपूर्ण शहरातील फुटपाथ मोकळी केली पाहिजे,असे माझे स्पष्ट मत आहे.नुकतीच एक भयावह आणि अंगावर शहारे येणारी घटना घडली. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मार्गावरील काटली गावानजीक ७ ऑगस्टला अल्पवयीन सहा मुले पहाटे ५.३० च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाली असताना अचानक भरधाव मालवाहू ट्रकने ६ मुलांना चिरडले यात ४ मुलांचा वेदनादायक मृत्यू झाला व दोन अजूनही गंभीर जखमी आहेत.ही जिवंत घटना रस्त्याच्या कडेला चालणाऱ्यां मुलांची आहे,यावरून आपण समजू शकतो की पायदळ किंवा मॉर्निंग वॉक करणे सुरक्षित नाही म्हणजेच घराच्या बाहेर निघतांना जीव मुठीत घेऊन निघावे लागते. फुटपाथवर चालणारा असो अथवा रोडच्या कडेला चालणारे असो यांना सुध्दा दुर्घटनेने सोडले नाही. त्यामुळे काही कारण नसताना दुर्घटना किंवा काही चूक नसतांना पायदळ घालणाऱ्यांच्या भयावह दुर्घटना होणे अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.यावर सरकारने व स्थानिक प्रशासनाने ताबडतोब अंकुश लावणे गरजेचे आहे.जेणेकरून सोलापूर शहरातील सर्वच फुटपाथ तथा पायदळ घालणाऱ्या सर्वांनाच मोकळीक मिळेल.

