प्रतिनिधी (प्रतिनिधी)- पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात विनाकारण त्रास देऊन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या दलीत समाजातील सतीश श्रीमंत सरवदे या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ची सविस्तर हकीकत अशीकी मंगळवार दि५ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाढण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ईश्वर वठार येथे राहणारा शिवाजी सलगर याने, रस्त्यावर बांधलेल्या आमच्या गायीला तू का उठवले, म्हणून सतीश सरवदे यांच्या मुलाला शिवीगाळ केली त्यानंतर सतीश सरवदे यांनी शिवाजी सलगर यांना विचारणा केली असता सतीश सरवदे यांच्या तोंडावर ट्रॅक्टर टॉमी चा रॉड मारून जबर जखमी केले यामध्ये सतीश सरवदे यांचे दोन दात पडून जबड्याचे दोन भाग झाले, सतीश यांची पत्नी स्वाती मुली धनश्री आणि प्रणाली यांना शिवाजी सलगर यांची बायको लक्ष्मी हिने शिवीगाळ केली, धनश्री हिच्या पायावर आणि पाठीवर दगडाने मारून जखमी केले, सरवदे यांचा मुलगा प्रज्वल यास गायीला का हटविले असा जाब विचारत जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले
शिवाजी सलगर याने यापूर्वीही असाच सतीश सरवदे यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता.
शिवाजी सलगर हा मुद्दामहून येणे जाण्याच्या ग्रामपंचायत च्या रस्त्यावर गायी बांधत असून रस्त्यावरून मोटरसायकलीवरून ये जा करणाऱ्यांचा धक्का लागला तर भांडणे उकरून काढून विनाकारण सतीश सरवदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ व दमदाटी मारहाण करत आहे
शिवाजी सलगर याने ट्रॅक्टरची टॉमी जबर तोंडावर मारल्याने सतीश सरवदे यांचे तीन दात पडले असून हनुवटी फाटली आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पंढरपूर विभागाचे पोलीस उप विभागीय अधीक्षक प्रशांत डगळे अधिक तपास करीत आहेत.
Tags
पंढरपूर