दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - नवीन जीएसटी क्रमांकाला मंजुरी देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महेश जरीचंद चौधरी (वय ४१, रा. हरिश्चंद्र नगर जुना उपळा रोड, धाराशिव) व आमसिद्ध इरण्णा बगले (वय ५०, रा. रेणुका नगरी, जुळे सोलापूर) अशी त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. तक्रारदार याची कन्स्ट्रक्शन फार्म असून जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी त्याने अर्ज केला होता. जीएसटी क्रमांकाला देण्यासाठी आरोपी महेश याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम दुसरा आरोपी बगले याने स्वीकारून ती महेशच्या टेबलवरील फाईलच्या खाली ठेवली. त्यावेळीच लाचलुच प्रतिबंधक विभागाने छापा मारून दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
