सोलापूर (प्रतिनिधी)- अकलूज येथील १३ सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तसा प्रस्ताव सादर केला होता. सध्या टोळीतील सगळे तुरूंगातच आहेत, पण आता त्यांच्याविरुद्ध 'मोक्का'चे कलम लागल्याने त्यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे.अकलूजमधील लक्ष्मण बंदपट्टे, ज्ञानेश्वर काळे या सराईत गुन्हेगारांविरुद्ध गंभीर गुन्हे असून त्यांच्या टोळीत आणखी ११ जण आहेत. त्या सर्वांनी मिळफन मागील दहा वर्षात संघटितपणे गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरोधात घातकशस्त्राने खूनाचा प्रयत्न, इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, मालमत्ता जबरीने ताब्यात घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, घातक हत्याराने सज्ज होऊन गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसा प्रयत्न करणे, असे शरीराविषयक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी टोळीतील सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ५५ नुसार तडीपारीची कारवाई केली होती. तरीपण, झालेली नव्हती. १६ जून रोजी त्यांनी त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा एकत्रित येऊन खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा केला होता. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा महानिरीक्षकांना मोक्काअंतर्गत कलम दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस महानिरीक्ष कांना मोक्का अंतर्गत कलम वाढविण्याचे अधिकार असल्याने पोलिस अधीक्षकांनी अकलूज पोलिस ठाण्याकडून आलेला प्रस्ताव महानिरीक्षकांना पाठविला होता. त्यानुसार पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अकलूजमधील त्या टोळीवर 'मोक्का'चे कलम लावले आहे.
Tags
सोलापूर जिल्हा