सोलापूर (विशेष प्रतिनिधी)- तिऱ्हे तरटगाव शिंगोली येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महापूर परिस्थिती दिसून आली आहे. सीना नदीतील पाण्याने तिऱ्हे येथील संपूर्ण पुलाने महापुराचे स्वरूप प्राप्त केले आहे , सीना नदीला गेल्या तीन दिवसांपासून जवळपास दोन लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान तिऱ्हे येथे असणारा पुल हा रौद्ररूप धारण केल्याने तिऱ्हे तरटगाव शिंगोली येथील शेती,नागरिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांना स्थलांतरील करण्यात आले असून अद्यापही पुराच्या पाण्याचे हाहाकार दिसून येत आहे.अश्यात नागरिकांचे होणारे हाल पाहता पूर परिस्थिती पाहता तरटगाव शिंगोली येथे असणारे हॉटेल चालक दाम्पत्य प्रमोद जाधव आणि अंजली जाधव यांनी आपले हॉटेल हे पूरग्रस्त नागरिकांसाठी जणू निवारा केंद्र बनविले आहे. पूरग्रस्तांना आणि स्थानिकांना मोठा प्रश्न निर्माण झाला होता की गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून स्थलांतरित केल्यानंतर कुठे जायचे? परंतु जाधव दाम्पत्याने क्षणाचाही विचार न करता आपले चालू असलेले हॉटेल पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न पाणी व निवाऱ्याची सोय केली आहे.त्यामुळे जाधव दाम्पत्याचे तिऱ्हे तरटगाव शिंगोली गावकऱ्यांकडून तोंड भरून कौतुक होत आहे. दरम्यान लोकशाही मतदारशी बोलताना अंजली जाधव म्हणाल्या आम्ही आमचे चालू असलेल्या हॉटेल मध्ये स्थानिक पूरग्रस्त नागरिकांना राहण्यासाठी सोय केली आहे पूर परिस्थिती ही अशी किती दिवस राहणार आहे,आम्हाला आमच्या हॉटेल पेक्षा सद्ध्या आमचे गावकरी महत्त्वाचे आहेत त्यामुळे आम्हाला देवाने गावकऱ्यांची सेवा करण्याची एक संधी दिली आहे असे म्हणाले.यावेळी गावकरी देखील आमची जाधव कुटुंबाने चांगल्या पद्धतीने आमची सोय केली आहे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आम्ही पूरपरिस्थिती नसून आम्ही घरातच आहोत असे वाटत असल्याची भावना व्यक्त करत जाधव दाम्पत्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले.दरम्यान जाधव दाम्पत्याचे पुढाकार पाहून अनेक संस्था संघटना सामाजिक क्षेत्रातील लोकांनी तेथील नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य देऊन मदत केल्याचे सांगण्यात आले.यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रमोद जाधव आणि अंजली जाधव सारखे लोकं वेळेला मदतीस धावून यावे आणि अश्या परिस्थिती मध्ये सर्वांनी एकमेकांशी जुळून राहून काम करावे सर्वांनी सर्वांना मदत करावे यासाठी जाधव दाम्पत्य हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे असे म्हटलं तरी हरकत नाही.
तरटगाव शिंगोली येथे जाधव दाम्पत्याचे कौतुकास्पद कामगिरी ; चक्क आपले हॉटेल बंद ठेवून केली पूरग्रस्तांची हॉटेलमध्ये निवारा आणि अन्न पाण्याची सोय
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर जिल्हा
.jpg)