सोलापूर (प्रतिनिधी)-दक्षिण सोलापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन सध्या भिमा आणि सिना नदीने रौद्र रुप धारण केला आहे.अनेक शेतकर्यांच्या शेतात,घरात आणि गावात पाणी शिरुर अतोनात नुकसान झाले आहे.अशा अस्मानी संकटात सर्व सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी जणू दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव अवतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कारण जेव्हा दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला तेव्हा पासून महादेव सध्या पायाला भिंगरी बांधून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येताना दिसून येत आहेत.बाधित शेतकरी व बांधित कुटुंबियांची भेट घेत संकटाच्या काळात महादेव कोगनुरे यांनी मदतीचा ओघ सुरु केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे.ज्या-ज्या वेळी दक्षिण सोलापूर तालुक्यात परिस्थिती गंभीर त्या-त्या वेळी महादेव कोगनुरे खंबीरपणे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहताना दिसून आले आहेत. सर्व सामान्य माणसाच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे महादेव कोगनुरे आता अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देत माणूसकी जपताना दिसून येत आहेत.
