अंदेवाडी ज गावाला पुराच्या पाण्याचा वेढा : अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन च्या टीमने बोटीच्या मदतीने केली पिण्याच्या व्यवस्था ; अंदेवाडी तील रुग्णांना काढले बाहेर



अक्कलकोट (प्रतिनिधी)-सध्या महाराष्ट्रसह सोलापूर जिल्हा 26, 27, 28 व 29 या दिवशी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले असून, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात दुवाधार पाऊस पडल्याने कुरनूर धरणातून दि. 27 सकाळ पासून 3000 क्यूसेक्स व नंतर 3800 क्यूसेक्स ने विसर्ग वाढवण्यात आला असून, याच विसर्गाचा फटका अंदेवाडी ज च्या गावाकऱ्यांना बसला असून, संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून, गेल्या 8 दिवसापासून गावचा संपर्क तुटला होता. 8 दिवस संपर्क तुटला असताना गावात पिण्याची पाण्याचे आर ओ फिल्टर पाण्याचे मशीन स्टॅटर संपूर्ण पाण्यात असल्याने आर ओ फिल्टर चालू बंद करणे धोक्याचे ठरत असून, गावात आजपर्यंत 5 दिवस शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले पण गेल्या दोन दिवसापासून पिण्याचे पाणी संपल्याने नागरिकांनी टाहो फोडतानाचे विदारक चित्र सध्या अंदेवाडी ज मध्ये पाहवयास मिळत होते.  गावात आर फिल्टर शिवाय दुसरे पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. गावातील नागरिकांनी तात्काळ अक्कलकोट चे तहसीलदार विनायक मगर यांना माहिती दिली त्यानंतर तात्काळ तहसीलदार साहेबांनी आपदा मित्रांच्या् मदतीने बोटीच्या साहाय्याने संपूर्ण गावाला पिण्याची पाण्याची व्यवस्था बोटीच्या साहाय्याने केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने गावाकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रविणकुमार बाबर, गोपीनाथ माने, हनुमंत सानप, रामचंद्र माने सोमनाथ आळुरे, यांचा समावेश होता. दरम्यान गावातील पोलीस पाटील श्रीशैल पाटील, ग्रामपंचायत ऑपरेटर नागेश कलमणी, महसूल सेवक हसन मुजावर, ग्रा प शिपाई प्रशांत कलमणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अंदेवाडी ज या गावाला पुराचा फटका बसला होता. गावच्या चारी बाजूला पाण्याचा घेरा असून गावातील आर ओ फिल्टर पाण्याखाली गेले असल्याने गावात दुसरे पिण्याचे व्यवस्था नसल्याने तात्काळ आपदा मित्रांच्या माध्यमातून बोटीच्या साहाय्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तहसीलदार - विनायक मगर, अक्कलकोट.

अक्कलकोट तहसीलदार साहेबांच्या सहकार्याने आपदा मित्रांच्या मदतीने आमच्या गावाला तात्काळ पिण्याची पाण्याची व्यवस्था केली असून, तसेच बोटीच्या साहाय्याने गावातील पेशन्ट देखील दळण वळण करण्यात आले. आजच्या या मदतीने आम्ही गावकरी समाधानी आहोत.नागेश कलमणी - , ग्रा प ऑपरेट, अंदेवाडी ज

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form