नागरिकांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांचे आवाहन

 


सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरात सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु असून आगामी काळात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, मिरवणुका आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश २७ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते ११ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत प्रभावी राहील, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी दिली.या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य  लग्न, अंत्ययात्रा यासारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही. तसेच सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्यास मिरवणुका, सभा, आंदोलने, निवेदने, धरणे यांना सूट मिळेल.पोलीस प्रशासनाने शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form